चाळीसगाव सट्टा घेणार्‍या चौघांवर कारवाई

0

चाळीसगाव – कल्याण नावाचा सट्टा घेणार्‍या दोघांना 1 जानेवारी रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजेश घोळवे, हवालदार बापूराव भोसले, पोलीस नाईक नितीन पाटील, पो.कॉ.प्रवीण सपकाळे, गोपाळ बेलदार, गोवर्धन बोरसे व जळगाव एलसीबीचे सपोनि रविंद्र बागुल, पोलीस नाईक दादाभाऊ पाटील, सुरज पाटील, पो.कॉ.हरीष परदेशी, अशोक पाटील यांनी रोख रकम व सट्ट्याच्या साधनांसह ताब्यात घेतले असुन त्यांच्यासह चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील पाटणादेवी नाक्याच्या समोर बगीचा परिसरात कल्याण नावाचा सट्टा घेतांना आज दिनांक 1 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास जळगाव एलसीबीच्या पथकाने आरोपी विनोद देशमुख (वय-50) यास 6830 रोख व सट्याच्या साधनासह ताब्यात घेतले आहे. सदर सट्टा उतराई भावडु उर्फ शंकर श्रावण पवार रा. चाळीसगाव यास देत असल्याचे आरोपीने सांगीतले. त्यावरुन भावडु उर्फ शंकर पवार याचेवर देखील कारवाई करण्यात आली असुन तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत. दुसरी कारवाई चाळीसगाव शहर पोलीसांनी दुपारी 4.55 वाजेच्या सुमारास शहरातील रिंगरोड लगत असलेल्या नदीकिनारी टपरीच्या आडोशाला सट्टा घेणार्‍या नाना रंगराव देवकर (वय-36) रा चामुंडा माता जवळ चाळीसगाव यास 1835 रुपये रोख व सट्याच्या साधनासह ताब्यात घेवुन त्याच्यासह पवन राणा रा.चाळीसगाव यांच्यावर कारवाई करण्यात आली असुन तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.