चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे दुर्गदिन उत्सव उत्साहात

0

चाळीसगाव । सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी 1 मे हा दिवस दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आदल्या दिवशी मध्यरात्री म्हणजेच 30 एप्रिल रोजी रात्री किल्यावर जाऊन दीपोत्सव साजरा केला जातो या दीपोत्सवासाठी 30 एप्रिल 2017 रोजी चाळीसगाव येथून तालुक्यातील मल्हारगड किल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलिप घोरपडे यांच्यासह मावळे सायंकाळी 6 वाजता तहसील कार्यालयापासुन रवाना झाले. रात्री जेवणझाल्यानंतर इतिहासावर चर्चासत्र करण्यात आले. रात्री 12 वाजता दीपोत्सव साजरा करण्यात आला. स्वराज्यासाठी सह्याद्रीच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या ज्ञात – अज्ञात मावळ्यांना मानवंदना देण्यात आली.

दिपोत्सव करून केली साफसफाई
1 मे 2017 रोजी सकाळी 7 वाजता स्वराज्याची व हिंदू धर्माची पताका असलेला परम पवित्र भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. व त्या नंतर किल्यावर साफसफाई करण्यात आली. हॉटेल आल्पोपहार तहसिल कार्यालयाजवळुन मल्हारगडाकडे सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, नगरसेवक शेखर देशमुख, गणेश पवार, शरद पाटील, विनोद शिंपी, रविंद्र सूर्यवंशी, अजय जोशी, फैय्याज शेख, धनंजय देशमुख, गजानन मोरे, मनोहर सोनवणे, सचीन घोरपडे, सचीन बोराडे, सचीन देवरे दिनेश घोरपडे यांचेसह कार्यकर्ते रवाना झाले.