चाळीसगाव स्टेट बँकेतून चेक गहाळ

0

चाळीसगाव। 18 एप्रिल रोजी स्टेट बँकेचा खातेदार असलेला इसम चेक वटवण्यासाठी गेला होता. बँकेतील अधिकार्‍यांनी त्यांना सदर चेक पेटीत टाकून देण्याची सुचना केली. अधिकार्‍यांच्या सुचनेनुसार त्यांनी चेकपेटीत टाकून दिले. मात्र हा चेक गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. खातेदाराने बँकेच्या व्यवस्थापकांकडे यासंबंधी लेखी तक्रार केली आहे. इसमाने बँकेतील त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीची मागणी केली आहे.

या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. अन्यथा बँक विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. चाळीसगाव शहरातील भडगाव रोड परिसरातील फुले कॉलनी राहणारे स्टेट बँकेचे खातेदार किशोर पाटील यांना सचिन रामजी सोमवंशी यांनी 30 हजार रुपयाचा 679079 या क्रमांकचा धनादेश दिला होता. किशोर पाटील हे 20 एप्रिल रोजी बँकेत गेले व पैसे जमा झाले का अशी चौकशी केली असता त्यांचे खात्यावर सदर रक्कम जमा नव्हती याबाबत जाब विचारला असता तुमचा चेक जमा न झाल्याचे सांगण्यात आले. बँकेतून अशा किंमती कागदपत्र गहाळ होत असतील तर सामान्य जनतेने कोणत्या विश्‍वासावर बँकेशी व्यवहार करावे, असा प्रश्‍न आहे.