सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याची माहेरच्या मंडळीची मागणी
जळगाव : धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील सुवर्णा तुषार पाटील(वय 22) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यु होत मृतदेह शेत शिवारातील विहिरीत आढळून आला आहे. दरम्यान, मयत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी हा घातपात असल्याचा आरोप करत या प्रकरणी सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार सुवर्णा पाटील हिचे शेरी, ता. धरणगाव येथील तिचे माहेर आहे. गेल्या डिसेंबर 2018 रोजी तिचा चावलखेडा येथील तुषार ह्याच्या विवाह झाला होता. सुवर्णा हिच्या सासरचे मंडळी हे तिला मारहाण करत मानसिक त्रास देत असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत 31 ऑगस्ट 2019 पासून ती बेपत्ता होती. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद सासरच्या मंडळींनी केली आहे. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी सुवर्णा हिचा मृतदेह तुषार पाटील यांच्या शेतीतील विहरीत आढळून आला.
नातेवायिकांकडून घातपाताचा आरोप
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविला. येथे मयत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी धाव घेत सदरची घटना ही घातपात असून लग्न झाल्यापासून सासरची मंडळी मयत सुवर्णा हिस मारहाण करत मानसिक त्रास देत होते. मयत सुवर्णा हिने अनेक वेळा याबाबत महेरच्या मंडळींना कल्पना दिली होती अशी माहिती विवाहितेचे काका संजय धोंडू पाटील यांनी दिली. तसेच 31 ऑगस्ट रोजी देखील तिला मारहाण झाल्यानंतर तिचा फोन आला असता मी दोन तासात पोहचतो असे सांगितले. त्यानंतर सुवर्ण बेपत्ता झाल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितले. सासरच्या मंडळींनी मारहाण करुन विहिरीत फेकले असल्याचा आरोप यावेळी मयत विवाहितेचे काका संजय पाटील यांनी केला असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. खुनाचा गुन्हा दाखल होत नाहे तोपर्यंत मृतदेह तब्यात घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.