बोदवड- तालुक्यातील चिंचखेडासीम येथील 35 वर्षीय विवाहितेचा 29 रोजी मृत्यू झाला. सुनीताबाई आत्माराम पाटील (35, रा.चिंचखेडासीम) असे मयत विवाहितेचे नाव असून याबाबत चिंचखेडासीम पोलिस पाटील विजय भरत गव्हारे यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, या विवाहितेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण कळू शकले नाही मात्र ही विवाहिता शेतात कापूस वेचणीसाठी गेल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजते तर बैलानेदेखील या महिलेला मारल्याने तिचा मृत्यू झाल्याचा कयास आहे. 30 रोजी या विवाहितेच्या मृतदेहावर मुक्ताईनगर तालुक्यातील कासारखेडा येथे माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले. या गुन्ह्याचे तपासाधिकारी उपनिरीक्षक चौधरी म्हणाले की, शवविच्छेदन अहवालानंतरच खरे मृत्यूचे कारण कळणार आहे.