चिंचखेडा बुद्रूक गावात दंगल ; पाच जण जखमी

0

18 जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर- तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे शेतीच्या वादावरून झालेल्या दंगलीत पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतीचा वाद आणि फिर्यादीने सोसायटीचे कर्ज काढल्याचा राग आल्याने संशयित नारायण पाटील, विजय पाटील, नाना पाटील, जितेंद्र पाटील, लखन पाटील, साहेबराव पाटील, नितीन पाटील, श्रीकृष्ण पाटील, अमोल पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, श्रीराम धायडे तुळशीराम धायडे, मंगेश धायडे, संजय तायडे, गजानन तायडे यांच्यासह एकूण 18 जणांनी चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, संतोष पाटील, प्रज्ञा पाटील व सपना संतोष पाटील (रा.सर्व चिंचखेडा बुद्रूक) यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत जखमी केले. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून 18 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश सोळंके पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे.