जामनेर । चिंचखेडे बुद्रूक येथील तुकाराम शिवराम भोई (वय 50) हे सोमवारी 28 रोजी सकाळी जामनेर नेरी मार्गावर फिरायला गेले असता त्यांना रस्ताच्या कडेला तुकारामाचा मृतदेह दिसला त्यांनी तात्काळ गावात येऊन बघितलेला प्रकार गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांना सांगितला सदर वार्ता वा-यासारखी गावात पसरली असता बघता बघता घटनास्थळी एकच गर्दी झाली. ज्ञानेश्वर पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता झालेला प्रकार भ्रमणध्वनीव्दारे जामनेर पोलीसांना कळविला. खादगाव येथील काही तरूण सुप्रिम इंडस्ट्रीज कंपनी गाडेगाव येथून आपली रात्रपाळीची ड्यूटी करून घरी परत येतांना त्यांना चिंचखेडे गावाजवळ गर्दी दिसली असता त्यांनी मृत व्यक्तीचे नाव तुकाराम असून तो आमच्याच गावचा असल्याचे सांगितले व तेथेच त्यांची ओळख पटली. त्या तरूणांनी झालेली घटना खादगाव येथे तुकारामच्या नातेवाईकाना कळविली.
अज्ञात वाहनधारक विरोधात गुन्हा
पोलीसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.मृत तुकाराम हा जामनेर नेरी मार्गावर कशासाठी गेला होतो ते अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. मृत तुकारामच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावाई असा परीवार आहे. चिंचखेडे बुद्रूक येथील पोलीस पाटील ज्ञानेश्वर ओंकार पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरूध्द जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल कदम करीत आहे.