चिंचखेड प्रगणे येथे विवाहितेचा विनयभंग

0

बोदवड : तालुक्यातील चिंचखेड प्रगणे येथे विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी संदीप सुपडा सुरवाडे (रा.चिंचखेड प्रगणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत विवाहितेच्या फिर्यादीनुसार 16 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास चिंचखेड प्रगणे येथे फिर्यादीच्या राहत्या घरासमोरील ओट्यावरून आरोपी संदीप सुपडा सुरवाडे याने फिर्यादीच्या अंगावर नोटा फेकून व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तुझ्या पतीला जर सांगितले तर त्याचा हात पाहून घेईल, अशी धमकी दिली म्हणून आरोपीविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय भोसले करीत आहेत.