चिंचगव्हाण जि.प. शाळेला ध्वनिक्षेपक संच भेट

0

चाळीसगाव- तालुक्यातील चिंचगव्हाणे गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यों कडून जि.प. प्राथ.शाळा चिंचगव्हाण शाळेला आधुनिक ध्वनिक्षेपक संच शाळेला समारंभ पूर्वक भेट देण्यात आला. गावकरी ,शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी वरील पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत गेल्या सोमवार 3 डिसेंबर रोजी चिंचगव्हाण ग्रा. पं. च्या सरपंच अनिता सुभाष राठोड,शा. व्य.समिती अध्यक्ष . पुरूषोत्तम निकम,उपाध्यक्ष विनोद पाटील(भोला) यांच्याकडून संयुक्तरित्या जि.प. प्राथ. शाळा चिंचगव्हाण शाळेस आधुनिक ध्वनिक्षेपक संच सप्रेम भेट दिला आहे . या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी,त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी त्याचा पुरेपुर उपयोग होईल. यामुळे विद्यार्थाना कविता, गाणी ऐकणे. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन,श्रवण, पाठांतर, वकृत्व स्पर्धा इ. उपक्रम राबविण्यास मदत होईल. अशी या भेटी मागे असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले कार्यक्रम प्रसंगी ग्रा.पं. चिंचगव्हाण चे ग्रामसेवक वीरभद्र कोरे, ग्रा.पं. सदस्य व कर्मचारी आनंदा निकम,प्रदिप निकम, अमोल सोनवणे, प्रा सुभाष राठोड, शाळा मुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे,शिक्षक महेश पाटील , श्री.बिरारी सर,पवार सर, महाले सर व ग्रामस्थ उपस्थित होते.