नवापूर। तालुक्यातील चिंचपाडा येथील श्रीमती धर्मीबाई गिरराज अग्रवाल सिनियर सेंकंडर स्कूल या शाळेचा इयत्ता दहावी चा निकाल 100 टक्के लागला आहे. चिंचपाडा या केंद्रातून परिक्षेला एकुण 103 विद्यार्थी प्रविष्ट होते. यापैकी 51 विद्यार्थी 1 ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले. केंद्रातंन प्रथम अनुष्का योगेश चव्हाण 600 पैकी 595 गुण प्राप्त करून शेकडा 99 टक्के गुण मिळाले आहेत.
तर केंद्रातून दुसरा क्रमांक परेश ओंकार पाटील 600 पैकी 590 शेकडा प्राप्त केले आहेत. केंद्रातून तीसरा क्रमांक पुथ्वी आश्विन मोदी 600 पैकी 587 शेकडा गुण प्राप्त करून 97.4 टक्के मिळवले आहेत. सर्व विद्यार्थानी घवघवीत यश संपादन करून शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या प्रथितयशा बदल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे संस्थापक ओमप्रकाश अग्रवाल, अध्यक्ष निरंजन अग्रवाल, उपाध्यक्ष संतोष शर्मा, संचालक मनिषकुमार अग्रवाल तसेच सर्व संचालक प्राचार्य बीजु मिड्डतिक, मार्गदर्शक शिक्षक, पालक यांनी गुणवंताचे अभिनंदन केले आहे. विशेष बाब अशी की द्वितीय भाषा हिंदी या विषयात अनिष्का चव्हाण व प्रशांत नाईक यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत.