चिंचवडगांवातील मोरया गोसावी मंदिर पाणी खाली

0

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असून पवना नदीला पूर आला असून पवनेने पात्र सोडले आहे. चिंचवडगांवातील मोरया गोसावी मंदिर पाणी खाली गेले आहे.

शहरातील अनेक परिसर जलमय झाले आहेत. पवनेचे नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. बंधाऱ्यांवरुन देखील पाणी जाऊ लागले आहे. मोरया गोसावी मंदिरात आज (शनिवार) सकाळी पाणी शिरले. त्यामुळे मंदिर परिसरात नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. त्याचबरोबर थेरगांव येथील केजू बंधाराही पाणीखाली गेला आहे. पवना धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली आहे. पवना नदीचे पाणी चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरात शिरले. त्यामुळे मंदिराच्या परिसराला तळ्याचे स्वरूप आले. मंदिर परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.