चिंचवडगावातून जैन तपस्वींची मिरवणुक

0
पिंपरी-चिंचवड:चिंचवडगाव परिसरातून जैन तपस्वींची बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. त्याला जैन बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेट्रोपॉलिटियन सोसायटीपासून कल्याण प्रतिष्ठानपर्यंतच्या या मिरवणूकीचे आयोजन चिंचवडगाव जैन श्रावक संघ आणि कल्याण प्रतिष्ठान यांनी केले. चैतन्य लुंकड (31 उपवास), ऋषभ जैन (22 उपवास) आणि पल्लवी जैन (8 उपवास) आदी तपस्वींची मिरवणूक काढण्यात आली.  कल्याण प्रतिष्ठान येथे लुंकड आणि पल्लवी जैन यांच्या पचक्खावणीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर संबंधितांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. साध्वी डॉ. चंदनाजी यांचे प्रवचन झाले.
काँग्रेस नेते अभय छाजेड, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर,  जैन कॉन्फरन्सचे महामंत्री डॉ. अशोककुमार पगारिया, सुरेखा कटारिया, चिंचवडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप नहार, कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश सेठिया, सुनील लुंकड, रमणलाल लुंकड, सुरेश लुंकड, राजेंद्र आणि रवींद्र लुंकड, सतीश बनवट, विलास पगारिया, रवींद्र नहार आदी उपस्थित होते. नंदकुमार लुणावत, संतोष धोका यांनी सूत्रसंचालन केले.