चिंचवडगावात सीएम चषक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
चिंचवड : चिंचवडगाव प्रभाग क्रमांक 18 मध्ये सीएम चषक रांगोळी व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रभागस्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 500 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त मंदार देव, माजी आमदार रामभाऊ गुंडीले, चिंचवडगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत पारखी, प्रयास महिला ग्रूपच्या अध्यक्षा माधुरी कवी व भाजयुमोचे प्रदेश सदस्य सचिन आरडे यांच्या हस्ते रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेनंतर प्रत्येक सहभागी खेळाडूंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केलेले प्रशस्तीपत्र व बक्षीसे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शेडगे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
स्पर्धा संयोजनात यांचा सहभाग…
यावेळी संयोजक नगरसेवक अ‍ॅड. मोरेश्‍वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, माजी नगरसेविका  कांता  मोंढे, प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, जेष्ठ नेता रविंद्र देशपांडे, भाजयुमोचे सरचिटणीस अजित कुलथे, काकडे पार्क सहकारी सोसायटीचे सचिव राजन पाटील, स्पर्धा समन्वयक संतोष निंबाळकर, भाजपा चिंचवडगाव प्रभाग अध्यक्ष तुकाराम चौधरी, सचिन कुलकर्णी, राघूशेठ चिंचवडे, दादा देवचक्के, स्वप्निल गावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मोरेश्‍वर शेडगे यांनी प्रास्ताविक केले अजित कुलथे यांनी सुत्रसंचालन केले. तर नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी आभार मानले.