चिंचवडगावात सुनेची आत्महत्त्या; पतीसह, सासरा, नणंदावर गुन्हा

0

दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडून वारंवार केला छळ

पिंपरी-चिंचवड : नवविवाहितेचा वारंवार मानसिक छळ करून तिला आत्महत्त्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी चिंचवडगावातील पतीसह सासरे, दोन नणंदा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपासात तिचा बळजबरीने दोनवेळा गर्भपात करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. सायली कुणाल कुलथे (वय 25, रा. संकल्प, कुणाल पार्कच्या मागे, केशवनगर, चिंचवडगाव) असे विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील शर दहिवाळ (वय 54, रा. सुयोगनगर, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती कुणाल कुलथे (वय 27) याच्यासह त्याच्या कुटूंबियाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अद्यात कोणालाही अटक केलेली नाही.

चार वर्षांपूर्वी विवाह
सायली यांनी चार एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास घरीच गळफास लावून घेत आत्महत्त्या केली होती. त्यानुसार सुरूवातील आत्महत्त्येचा गुन्हा गुन्हा नोंद केला केला होता. मात्र, दु:खातून सावरल्यानंतर त्यांनी कुुटूंबियांविरोधात सविस्तर तक्रार केली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली हिचे कुणाल कुलथे याच्या सोबत चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. ती पतीसोबत केशवनगरात कुटूंबियांसोबत राहत होती. यावेळी कुणाल याच्या सोबत सासरे दोन नणंद यांनी आपसात संगनमत करुन किरकोळ कारणावरुन तिला टोचून बोलून, संशय घेवून, तसेच तीला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडून, तीला शिवीगाळ करायचे तसेच तीला मारहाण देखील करायचे या त्यांच्या त्रासाला कंटाळून सायलीने आत्महत्या केली. याप्रकरणी कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.