चिंचवड : भारत निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदार संघात रविवारी (दि.21) विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. महिला, 18 वर्षावरील नव मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी फॉर्म स्विकारण्यात येणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोहिम आहे. जास्तीत-जास्त पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज जमा करावेत, असे आवाहन केले आहे.