चिंचवड : चिंचवड नवरात्र महोत्सवांतर्गत आज (रविवारी) चिंचवड येथे पारंपारिक वाद्यांच्या महावादनाच्या ताल घोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी दिली. चिंचवड बस स्टॉप, चापेकर चौकाजवळील प्रांगणात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता वादनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवांतर्गत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध पथकांचा सहभाग
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवाज्ञा ढोल-ताशा पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक, पुण्यातील नूमवि वाद्यपथक, श्री शिव दुर्गा ढोल-ताशा पथक, एक दिल ताशा पथक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी ज्ञानप्रबोधिनीचे उत्कृष्ट ताशावादक, ताशाशिक्षक राजण घाणेकर, ढोल-ताशांचे व्यापारी जीवन काकडे आदी उपस्थित राहणार आहेत. ढोल-ताशा वादनाच्या स्पर्धेबाबत अधिक माहिसाठी गणेश गोलांडे यांच्याशी यांच्याशी संपर्क साधावा. ढोल-ताशा वादनाच्या कार्यक्रमाचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केले आहे.