चिंचवडमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

0

चिंचवड : आई-वडील कामावर गेल्यानंतर एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवड येथील रामनगरात घडली. श्यामल राजेंद्र नलावडे (वय 19, रा. रामनगर, चिंचवड) असे आत्महत्या करणार्‍या विद्यार्थिनीचे नाव आहे. दरम्यान, श्यामल हिने आत्महत्या का केली, याचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कला शाखेत घेत होती शिक्षण
श्यामल ही चिंचवड येथील एका महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिकत होती. शनिवारी तिचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. श्यामल एकटीच घरी होती. सायंकाळी सातच्या सुमारास आई-वडील कामावरून घरी परत आले. त्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडला असता, श्यामल घरातील छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.