चिंचवडला शनिवारी ‘शौर्या तुला वंदितो’

0

चिंचवड : हनुमान प्रचार समिती पुणे, सह्याद्री प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय सैनिक संस्था यांच्या वतीने शनिवारी (दि.16) चिंचवड येथे ‘शौर्या तुला वंदीतो’ या कार्यमातून 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातील आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. तसेच या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी विद्यार्थी व नागरिकांना ले. जनरल दीपक समनवार, अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी, आयर्न मॅन ट्रायथलॉनचे विजेते विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश आई पी एस, डॉ. विनोद टिबरेवाल, इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवड़े, सालासर हनुमान प्रचार समिति अध्यक्ष बाबूलाल निर्वाण, संजय केळकर, विलास वहाणे आदी उपस्थित राहणार आहेत.