चिंचवड परिसरात बांधकामे पाडली

0

चिंचवड : महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चिंचवड परिसरात चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 17 चिंचवड, येथे अनधिकृत बांधकामे चालू होती. अनधिकृत बांधकाम विभागाने मंगळवारी या बांधकामांवर धडक कारवाई केवी. या कारवाईमध्ये चिंचवड येथील एक वीटबांधकाम, एक पत्राशेड व एक आरसीसी असे एकूण तीन बांधकामावर (3122.64 चौरस फुट)कारवाई करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली. ही कारवाई कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशव फुटाणे, कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांचे पथकाने केली. महापालिका पोलीस व चिंचवड पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.