चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने परिचारिकांचा सत्कार

0

जागतिक परिचारिकादिनानिमित्त उपक्रम

पिंपरी : अनेक परिचारिका अहोरात्र कष्ट करतात. प्रसिध्दीपासून दूर असतात. अशाची दखल सामाजिक संघटना घेतात. परिचारिका म्हणून सेवाभावी वृत्तीचे काम करण्याची संधी मिळाली. हे तुमचे भाग्य आहे, असे मत यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांनी व्यक्त केले. चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विविध विभागात काम करणार्‍या परिचारिकांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, मेट्रन मोनिका चव्हाण, सहाय्यक मेट्रन माया गायकवाड, पांडुरंग म्हस्के, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी विनोद जैन, नारायण भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी निलीमा झगडे, वैशाली शिवरकर, दीपिका पवार, सुशीला जोगदंड, स्नेहा परब, सीमा शेटे, दया देशपांडे, हेमा काळे या स्टाफ नर्स व गरीब व असहाय्य रुग्णांना मोफत औषध देणे व गरजेनुसार कामे करणा-या रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेचे सेवाभावी कर्मचारी दत्ता वाघमारे, मिलिंद माळी यांना रुग्णसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, गुलामअली भालदार यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. गीता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग म्हस्के यांनी आभार मानले.