चिंचवड मतदार संघात आज मतदार नोंदणी

0

पिंपरी-चिंचवड : भारत निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदार संघात आज शनिवारी 23 रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व मतदार मदत केंद्रांवर फॉर्म नं. 6,7,8 व 8 ’अ’ चे फॉर्म स्वीकारण्यात येणार आहेत. मतदार मदत केंद्रे अशी : चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय (यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुल, दुसरा मजला, थेरगांव), महापालिका मुख्य इमारत (कर आकारणी व कर संकलन विभाग), ब ड आणि ह क्षेत्रीय कार्यालय. सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत कामकाज चालेल.