चिंचवड येथे व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू

0

चिंचवड-शेजा-यासोबत किरकोळ वाद झाल्यानंतर सुमारे दोन तासांनी एका व्यावसायिकाचा संशयितरित्या मृत्यू झाला. हा प्रकार आज शुक्रवारी चिंचवड स्टेशन येथे झाला. संतोष बहिरवडे (वय 40, रा.चिंचवड ), असे मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

संतोष हे दुधाचा व्यवसाय करत होते. त्यांचा शेजारी अजय पवार याच्यासोबत उसने पैसे घेण्यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज सकाळी त्याच कारणावरून पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणाच्या दोन तासानंतर संतोषचा मृत्यू झाला.संतोषच्या पत्नीने मारहाण झाली असल्याचा आरोप केला आहे. मात्र संतोषच्या अंगावर मराहाणीचे व्रण आढळले नाहीत. संतोषचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.