धुळे । हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याचे निमित्त होवून रविवारी रात्री धुळे तालुक्यातील चिंचवार गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रार दिल्याने 32 जणांवर गुन्हा दाखल झाला. या घटनेत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून घटनेची माहिती मिळताच साक्री विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश सोनवणे, सोनगीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक सी.एम.चतुरे यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देवून यातील 13 आरोपींना अटक केली आहे.
याबाबत किशोर भगवान मासुळे याने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास बाबुलाल हरी पाटील यांच्या घराजवळ हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याचे निमित्त होवून काल सकाळी 8 वाजता धनराज हिरामण पाटील, भुरा शांताराम पाटील, भगवान हिरामण पाटील, सखाराम बाबुलाल पाटील, सोमनाथ हिरामण पाटील, कारभारी हिरामण पाटील, सोमनाथचा भाचा योगेश विठ्ठल पाटील, बापू उखा पाटील, दासभाऊ उखा पाटील, संदीप बापू पाटील, ज्ञानेश्वर बापू पाटील, विलास तुळशीराम पाटील, विलास जगन्नाथ पाटील यांनी हातात लाठ्या-काठ्या, सळई, विटा घेत हल्ला चढविला. यावेळी दिलीप मासुळे, कल्पेश मासुळे यांनी लोखंडी सळईने मारहाण केल्याने किशोर भगवान मासुळे, शिवाजी आप्पा मासुळे, सागर देविदास मासुळे हे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किशोरच्या तक्रारीवरुन मारहाण करणार्या 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर संजय हिरामण बागुल याने दिलेल्या तक्रारीनुसार परवा रात्री हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याचे निमित्त होवून साहेबराव संजय मासुळे, शालिक रतन मासुळे, हिलाल आप्पा मासुळे, राकेश रघुनाथ मराठे, यशवंत रघुनाथ मराठे, श्रीपत अण्णा मासुळे, सुकदेव आप्पा मासुळे, दगा रगमल मासुळे, पोपट यादव मासुळे, भगवान यादव मासुळे, कल्पेश श्रीपत मासुळे, बंटी दिलीप मासुळे, रुपेश श्रीपत मासुळे, नितीन जिभाऊ मासुळे, शिवाजी आप्पा मासुळे, देवा रंगमल मासुळे, त्यांचा मुलगा, भाऊसाहेब दिलीप मासुळे आणि दिपक दगा मासुळे यांनी हाता लाठ्या-काठ्या व लोखंड सळई तसेच दगड, विटांचा मारा करीत हल्ला चढविला. या मारहाणीत संजय हिरामण बागूल, कारभारी हिरामण बागूल, हिरालाल बाबुलाल बागुल, सखाराम बाबुलाल बागूल, धनराज हिरामण बागूल हे जखमी झाले.