चिंचवार येथील नादुरूस्त बंधार्‍यांच्या दुरूस्तीला सुरूवात

0

धुळे । तालुक्यातील चिंचवार येथील नादुरुस्त आणि गाळ साचलेल्या बंधार्‍याच्या दुरुस्तीचे काम ग्रामस्थाच्या श्रमदानातून सुरु करण्यात आले. 1995 साली चिंचवार गावात शासनाने बंधारा तयार केला होता.

मात्र गेल्या 10 वर्षापासून हा बंधारा अनेक ठिकाणी फुटून त्यात पाणी साठत नव्हते. जेसीबी मशिनचे आणि बंधार्‍याचे पुजन करुन गाळ काढण्याच्या व बंधारा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या बंधारा दुरुस्ती कामाच्या शुभारंभप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह लक्ष्मण आनंदा पाटील, गंगाराम पाटील, युसूफ पटेल, रउफ देशमुख, संतोष पाटील, प्रदीप लकडे, कैलास माळी, चिंचवार गटाचे शिवसेना उपतालुका प्रमुख सुदर्शन पाटील, नगरसेवक प्रफुल्ल पाटील, रामीचे सरपंच रोहिदास महाजन, भटू आप्पा गवळी, निलेश शिंपी आदींसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.