वरणगाव- मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील मजुरी काम करणार्या दशरथ सीताराम पाटील (55) यांचा गुरुवारी सायंकाळी हतनूर शिवारातील विहिरीत बुडून मृत्यू झाला. दशरथ पाटील हे बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीही एक न सांगता घराबाहेर पडले होते तर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतल्यावर ते सापडले नाही. दरम्यान, हतनूर शिवारातील भागवत गंगाराम महाजन यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. पोलिस पाटील सचिन पाटील (रा.चिंचोल) यांनी वरणगाव पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान पाटील यांनी आत्महत्या केली की अन्य कारणांनी त्यांचा मृत्यू? झाला याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेंद्र तायडे, अतुल बोदडे तपास करीत आहेत.