यावल- तालुक्यातील चिंचोली येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने फुस लावुन पळवुन नेल्याची घटना गुरूवारी सकाळी 10 वाजेला घडली. पिडीतेच्या वडीलांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही इयत्ता 11 वीत गावातील सार्वजनिक विद्यालयात शिक्षण घेते. गुरूवारी सकाळी 10 वाजेला कुटुंबीय घरात नसतांना गावातीलचं संतोष धनसिंग रणसिंगे याने तरुणीला काहीतरी फूस लावुन पळवून नेल्याचा आरोप आहे. आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील तायडे करीत आहेत.