चिंचोलीत पुर्ववैमनस्यातून हाणामारी

0

जळगाव। तालुक्यातील चिंचोली येथे गावात हनुमान जयंती कार्यक्रमात गावातीलच पुर्ववैमानस्यातुन शिवीगाळ होवून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यात दोन वेगवेगळ्या तक्रारदार महिलांतर्फे विनयंभग हाणामारीच्या तक्रारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. मारहाणीतील एक महिला पिडीता जखमी असुन तीच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जळगाव तालूक्यातील चिंचोली गावात मंगळवारी हनुमान जयंतीनिमीत्त भंडारा आयोजीत करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
संपुर्ण गाव एका ठिकाणी एकवटला असतांना पुर्वीच्या वादातुन दोन कुटूंबात वाद होवुन हाणामारी होवुन त्यात महिलांचे कपडे फाडल्याचा प्रकार घडला. जिल्हारुग्णालयात वॉर्डक्र. 12 मध्ये दाखल बत्तीसवर्षीय जखमी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संजय शालिग्राम घुले, अनील शालीग्राम घुले, पवन घुले यांच्या विरुद्ध मारहाणीसह विनयभंग केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात नमुद केल्या प्रमाणे पिडीताने यापुर्वी नोहेंबर-2015, डिसेंबर 2016 रोजी संशयीताच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन खटल्याचे कामकाज सुरु झाले आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी संशयीतांतर्फे न्यायालयात, गावात, बसस्टॅण्ड सारख्या सार्वजनीक ठिकाणावर धक्के मारुन, वेगवेगळ्या लोकांद्वारे छेडखानी करण्यात येते. विरोधी गटातील 47 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे मुकेश पंडीत पठार याने शिवीगाळ करुन, मारहाण केली तसेच ब्लाऊज फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तीच्या बहीणी कडूनही मारहाण करण्यात आली, या प्रकरणात औद्योगीक वसाहत पोलिसांत दोन परस्पर विरोधी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.