यावल– तालुक्यातील चिंचोली येथे विषबाधेमुळे सात गुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली गेल्या पंधरा ते विस दिवसापूर्वी देखील अशाचं प्रकारे गुरं दगावली होती एका शेतात रोटाव्हेटर केले होते तेथे सडलेली केळीचे खोड खाल्याने ही घटना घडली. चिंचोली येथील ग्रामस्थांची 70 ते 80 गुरांचा कळप नेहमी प्रमाणे गुराखी शेतात चराई साठी घेवुन जातात. सोमवारी देखील सर्व गुरे एका रोटाव्हेटर केलेल्या शेतात चरत असतांना सडलेली केळीचे खोड खाल्याने गुरे दुपारी घरी परतीच्या मागावर असताना एक एक गुरांना विषबाधा होवुन त्यांचा मृत्यू झाला. यात चिंचोली येथिल रहिवासी गोकुळ पंढरीनाथ कोळी यांची 1 गाय, प्रल्हाद गेंदु सोळुंके यांची मालकीच्या 2 म्हैस,2 बैल,1 गाय, शिरीष नाथुलाल नवाल यांची मालकीची 1 गाय अशा एकुण 7 गुरांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच किनगाव पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.भगुरे, डॉ.शिंदे, देवगाव, धानोरा चिंचोली, डांभुर्णी येथिल पशुवैद्यकिय अधिकारी यांनी वेळीच चिंचोली येथे भेट देवुन इतर गुरांवर औषधी उपचार करून इतर गुरांचे प्राण वाचविले. सुमारे 15 दिवसांपुर्वीच अशा प्रकारे काठेवाडीच्या कडपातील दहा ते बारा गुरांचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाला होता. व पुन्हा ही दुसरी घटना असल्याने शेतकरी व पशुपालक वर्गातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.