चिंचोली शिवारातून व्यापार्‍याची दुचाकी लंपास

भुसावळ/जळगाव : तालुक्यातील चिंचोली शिवारातून राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोरून व्यापार्‍याची दुचाकी लांबवण्यात आली. शहर व परीसरात सातत्याने दुचाकींची चोरी होत असल्याने वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे..

दुचाकी चोरींचे सत्र कायम
जळगाव तालुक्यातील धालवडी यथील राजेंद्र एकनाथ मानके हे कामानिमित्ताने रविवार, 13 मार्च रोजी चिंचोली शिवारातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आले होते. या दरम्यान त्यांनी मंगल कार्यालयासमोर त्यांची दुचाकी (एम.एच 19 बी.के.2113) उभी केली मात्र काही वेळेतच चोरट्यांनी ती लांबवली.
तीन ते चार दिवस सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळून न आल्याने अखेर राजेंद्र मांडके यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गफूर तडवी करीत आहेत.