नवी दिल्ली: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा भारतातही मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतातील कोरोना ग्रस्तांची संख्या आता 15 हजाराच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात भारतात कोरोनाचे 1334 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे हा आकडा आता 15722 वर पोहोचला आहे. त्यातील 12974 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. 2230 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आतापर्यंत 507 रुग्णांचा देशात मृत्यू झाला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने सरकार पुढे मोठी समस्या उभी राहिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 3 में पर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र तरीही रुग्ण संख्येत वाढच होत आहे. देशात कोरोनाचे सर्वाधीक रूग्ण
महाराष्ट्रात आहेत.