मुंबई: भारतातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रुग्ण संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. आजही रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रातील रुग्ण संख्या आता 1895 वर पोहोचली आहे. आज नव्याने 134 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. आज मुंबईत एकाच दिवशी 113 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. दररोज मुंबईतील कोरोना बधितांच्या संख्येत मोठी वाढ होतांना दिसत आहे. मुंबई खालोखाल, नागपूर, पुण्यातील रुग्ण संख्या आहे. काल महाराष्ट्रात कोरोना बधितांची संख्या 1761 वर होती. त्यात आज नवीन 134 रुग्णांची भर पडल्याने लवकरच महाराष्ट्रात दोन हजाराचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.