मुंबई-पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने कॉंग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना भाजपात आणून उमेदवारी दिली आहे. ही पोटनिवडणुक सेना-भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणूक प्रचारला वेग आला आहे.
असा करत आहे प्रचार
दरम्यान भाजप चिंतामण वनगा यांच्या नावाने मत मागत आहे. प्रचारासाठी करत असलेल्या जाहिरातीवर भाजपने ‘एक मत चिंतामण वनगा यांच्या कार्यासाठी’ असे नमूद केले आहे. भाजप चिंतामण वनगा यांच्या कार्यासाठी मत मागत आहे मात्र वनगा यांचे पुत्र शिवसेनेकडून लढत आहे. या जाहिरातीवरून पालघर जिल्ह्यातील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
आरोग्यासाठी…#Palghar#पालघर #BJPForPalghar@BJP4India pic.twitter.com/ImWex9WtXA
— महाराष्ट्र भाजपा (@BJP4Maharashtra) May 17, 2018