पुणे:- देशासह राज्यात रोज कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असून याची चिंता फारशी नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढते आहे त्याची चिंता जास्त असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात सांगितले.
तसेच राज्यात यापुढे लॉकडाउन असणार नाही तर अनलॉक दोन आणि तीन असणार आहे अशी मोठी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात केली आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे टोपे यांनी सांगीतले.
जुलै ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या वाढू शकते अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली. पुणे आणि सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख आढावा घेत आहोत असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी १ लाख अँटीजेन चाचण्या घेण्यात येणार आहेत त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची घोषणा टोपे यांनी यावेळी केली.