पाचोरा । येथील कुष्णापुरी भागातील रहिवाशी आईच्या चितेला अग्निडाग देत मुलीने जुन्या रितीरिवाजांना फाटा दिला. या मुलीच्या या निर्णयाचे शहरासह परिसरातून स्वागत करण्यात येत आहे. कुष्णापुरी भागातील रहिवाशी रामलाल राठोड याच्या पत्नी सौ सगुणाबाई राठोड (वय 56) यांचे काल रात्री निधन झाले
व्याह्याकडून धमक्यांमुळे जगणे मुश्कील
सगुणाबाई व रामलाल राठोड यांना तीन मुली एक मुलगा असून मुलगा जगदीश पाच वर्षापासून वृद्ध आई- वडिलांचा सांभाळ न करता सासरी निघून गेलेेला होता मात्र त्याचे पत्नीशी भांडण झाल्यावर जगदीश तेथूनदेखील बेपत्ता झाला जगदीशची पत्नीं साधनाबाइने सासू सगुणाबाई ,सासरे रामलाल व जगदीशच्या विरोधात कोर्टात केस केली साधनाबाइचे वडील प्रेमसिग चव्हाण वारंवार रामलाल राठोडकडे येऊन जीवे मारण्याची धमकी देत या धमक्यांच्या त्रासाने सगुणाबाई चिंताक्रांत झाल्या होत्या या काळजीतच त्यांचा आजार बळावून त्यांचे निधन झाले, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
जगदिशने येणे टाळले
जवळच्या नातेवाईकांनी जगदीशला दूरध्वनी करून संपर्क साधला असता त्याने आईच्या अंत्ययात्रेत येण्यास टाळले आज सकाळी सर्व नातेवाईकांनी आईच्या चितेला अग्निडाग देण्यासाठी जगदीशची आतुरतेने वाट पाहिली शेवटी सगुणाबाईच्या तीन मुली आरती चौहान, शीतल पवार व भारती चव्हाण यांनी आईच्या चितेला भावाची वाट न पाहता अग्निडाग दिला जगदीश मुलगा आईवडिलांना असून नसल्यासारखा झाला.
व्याह्याने शेती हडपल्याचा आरोप- त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईवडिलांना धमक्या देऊन शेती हडप केल्याचा प्रकारदेखील केला आहे व त्यांची आता त्यांच्या राहत्या घरावर नजर असल्याचे रामलाल राठोड यांनी सांगितले त्यांच्या जावयांनीही मोठ्या मनाने आपल्या पत्नीच्या मनातील इच्छा व आईवरील प्रेम ओळखून सासुबाईंना अग्निडाग देण्यास सांगितले. सगुणाबाईला अग्निडाग देऊन मुले किंवा मुली असा भेदभाव करणार्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे राठोड समाजातील हे पहिलेच उदाहरण असल्याचे यावेळी लोकांनी सांगितले.