चिंबळी परिसरातील रस्ता गेला खड्ड्यात

0

चिंबळीः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणातील आळंदीकडे जाणार्‍या रस्त्यावर साईड पट्ट्या, चारी नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असते. त्यात हा रस्ता वर्दळीचा असून रात्रं-दिवस मालवाहतूक गाड्यांची वाहतूक सुरू असते. गेल्या आडवड्यापासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे. पायी चालणे व मोटार सायकल चालविणे मोठे कसरतीचे झाले आहे. त्यामुळे रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हेच कळेना! या रस्त्याची दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होते आहे. या गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.