चिकन विक्रेत्याकडे खंडणीची मागणी

0

तळेगाव दाभाडे- मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील एका चिकन विक्रेत्याकडे संरक्षणासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार बुधवारी घडला. उमर उस्मान मकबूल शेख (वय 38, टाकवे बुद्रुक, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाजीराव सुदाम खुरसुले (खुरसुलेवाडी निगडे, ता. मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टाकवे बुद्रुक येथे चिकन विक्रीचे दुकान आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास बाजीराव याने शेख यांना फोन केला. फोनवर बाजीराव याने शेख यांच्याकडे त्यांच्या संरक्षणासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. तसेच याबाबत पोलिसांना सांगितल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देखील दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.