तळेगाव दाभाडे शहरा करीता सीएसआर फंडातून सीसीटिव्ही कॅमेरे
तळेगाव दाभाडे :- येथील चिकाऊस्को प्रायव्हेट कंपनी कडून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला व शहरवासीयांना उपयोगी पडेल अश्या लोकोपयोगी सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या वस्तू कंपनीचे सीए तिंलक अगरवाल व अंतरा नंदी यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे दि. 26 रोजी हा कार्यक्रम पार पडला. चिकाऊस्को प्रायव्हेट कंपनी कडून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला दिलेल्या वस्तू देहूरोड ग्रामीणचे उपाधीक्षक गजानन माडगुळकर,पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी स्वीकारल्या. चिकाऊस्को कंपनी कडून वाटर कुलर,रस्ते सुरक्षेसाठी दहा बरीकेट, दोन अग्निक्षमण यंत्र पोलीस स्टेशनसाठी तर तळेगाव शहरासाठी दहा सीसीटीव्ही कॅमेरे कंपनीच्या सी.एस.आर फंडातून दिले. या कंपनीच्या सहकार्याचा तळेगाव शहरासाठी चांगला उपयोग होईल. असे मत यावेळी वरिष्ठांनी यावेळी व्यक्त केल.