चिखलीजवळ भरधाव टँकर उलटला

0

भुसावळ । मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली-घोडसगाव महामार्गावर भरधाव टँकर (क्र.आर.जे.12 ए.वाय.9805) उलटल्याची घटना 18 रोजी मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी टँकर चालक राजेंद्रकुमार किदतरामजी दारा (रा.घोसीमना राजस्थान) यांनी फिर्याद दिल्यावरून मुक्ताईनगर पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय निकम करीत आहेत.