चिखलीतील बेकायदा बांधकामे पाडली

0

पिंपरी-चिंचवड । महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चिखली येथे चालू असलेल्या दहा अनधिकृत बांधकामावर गुरुवारी कारवाई केली. चिखली परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. यापुढेही शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

आरसीसी बांधकामे रडारवर
या कारवाईत नारायण हाऊसिंग सोसायटी, दुर्गानगर व संगम हाऊसिंग सोसायटी, चिखली येथे चालू असलेल्या दहा अनधिकृत आरसीसी बांधकामांवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत असलेल्या आरसीसी बांधकामांवर विशेष लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता देसले, महापालिकेचे कर्मचारी, दोन जेसीबी, एक डंपरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.