चिखलीतून दोन बहिणी बेपत्ता; रिक्षा चालकावर संशय

0
पिंपरी चिंचवड : चिखलीतून दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांनी एका रिक्षा चालकावर संशय घेण्यात आला आहे. त्यावरून रिक्षा चालक प्रतिक (पूर्ण नाव माहित नाही, रा. पालघरे वस्ती, लांडगे चाळ, कुदळवाडी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार त्यांच्या दोन्ही मुलींसह पालघरे वस्तीत राहतात. एक मुलगी 18 वर्षे आणि दुसरी 16 वर्षाची असून दोन्ही मुली गुरूवार (दि. 3) पासून बेपत्ता आहेत. रिक्षाचालक प्रतिक यानेच आमिष दाखवून मुलींना पळवून नेल्याची तक्रार मुलींच्या वडिलांनी केली आहे. त्यानुसार रिक्षाचालक प्रतिक याच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.