चिखली : हनुमान जयंती व चिखली गावाचे आराध्य दैवत भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाचे औचित्य साधून कुदळवाडी, चिखली येथे पाणपोईचे लोकार्पण आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. बैलगाडा शर्यत सुरू केल्याबद्दल या कार्यक्रमप्रसंगी आमदार महेश लांडगे यांचा सत्कार महेश लांडगे युवा मंचच्या वतीने करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी महेश लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव, नगरसेवक संजय नेवाळे, राहुल जाधव, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, दत्तात्रय मोरे, विजय यादव, काळुराम यादव, किसन यादव, आनंदा यादव, बाळासाहेब मोरे, किसन बावकर, युवराज पवार, नरहरी बालघरे, नितीन मोरे, उत्तम बालघरे, राजेश नेवाळे, संदीप नेवाळे, योगेश यादव, विकास यादव, राजेश डोंगरे, दीपक घन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दिनेश यादव व मित्र परिवाराने केले होते.