चिखलीत शिवजयंती मंडळाचे गरिबांसाठी अन्नछत्र

0

पिंपरी: कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासठी शासनाने लॉक डाउन केले आहे. तसेच शासनाने केलेल्या संचार बंदीमुळे अनेक छोट्या कंपन्यामधील कामगार , मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये याहेतूने टाळगाव चिखली येथील एक गाव एक शिवजयंती उत्सव मंडळाने मोफत अन्नछत्र सुरू केले आहे.

चिखली परिसरात सोनवणेवस्ती , कुदळवाडी ,मोरेवस्ती , बालघरेवस्ती ,जाधववाडी ,ताम्हणेवस्ती ,रामदासनगर ,नेवाळेवस्ती अशा विविध भागातील गरजू लोकांना घरपोच भोजन दिले जाते.  अन्नछत्रात काम करणारे अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते , सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी करीत आहे. स्वतः मास्क , हँगलोज वापरात आहेत.
तसेच एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून गरीब , गरजू लोकांच्या वस्तीवर जाऊन कार्यकर्ते अन्नदान करीत आहेत.या अन्नछत्रात दररोज हजारो लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. तसेच अन्नदान करण्याबरोबर कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.याचबरोबर अनेक स्वच्छता कामगारांना मास्क वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे हजारो गरिबांनी समाधान व्यक्त केले.