चिखलीत संत शिरोमणी सावतामाळी महाराज भाजी मंडईचे उद्घाटन

0

माजी महापौर राहुल जाधव यांची संकल्पना पूर्णत्वात

पिंपरी चिंचवड – प्रभाग क्रमांक 2 जाधववाडी चिखली येथील संत शिरोमणी सावता माळी महाराज भाजी मंडईचे उद्घाटन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते सोमवारी झाले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव, दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल जाधव, प्रिती बोंडे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत जाधव, नितीन बोराडे, रवी जांभूळकर, किसन बावकर, सतीश लांडगे, वाघोले, काका जाधव, नामदेव जाधव, संभाजी घारे, प्रताप भांबे, सुरेश जाधव, त्याचप्रमाणे प्रभागातील सर्व ग्रामस्थ सर्व छोटे-मोठे व्यवसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी महापौर राहुल जाधव यांच्या संकल्पनेतून या भाजीमंडईची निर्मिती करण्यात आली आहे. जाधव सरकार चौक ते सावता माळी मंदिर या मार्गावर कुठल्याही प्रकारच्या व्यवसायांच्या टपर्‍या किंवा इतर व्यवसाय फुटपाथ वरती चालू असणार नाहीत अशी माहिती यावेळी राहुल जाधव यांनी दिली.

पूर्वी ही भाजी मंडई सेक्टर-16 राजे शिवाजीनगर मधील डायगनो मॉल समोरील जागेमध्ये बसत होते. परंतु प्रभागातील जनतेला रहदारीच्या समस्येला मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जावे लागत होते. म्हणून नंतर काही दिवसात ही भाजी मंडई सेक्टर-16 मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामधील मोकळ्या जागेमध्ये स्थलांतरीत करण्यात आली. परंतु नंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणामध्ये समस्यांचा सामना करावा लागला. भाजी मंडईमध्ये व्यवसायिकांना थेट पद्धतीने शेतकर्‍यांकडून शेतीमाल किंवा भाजीपाला विकत मिळवून देण्यासंबंधी नियोजन पुढच्या काळामध्ये करण्यात येईल, असे यावेळी राहुल जाधव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकूण 72 गाळ्यांचे वाटप याठिकाणी लकी ड्रॉ सोडत पद्धतीने गाळेधारकांना करण्यात आले. या सोडतीमध्ये फक्त भाजी विक्रेत्यांसाठीच्या गाळ्याचे वितरण करण्यात आले. उर्वरित छोट्या व्यवसायांसाठी पुढील पंधरा दिवसांमध्ये परत एकदा लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढून राहिलेल्या उर्वरित गाळ्यांचे हस्तांतरण या व्यवसायिकांना करण्यात येणार आहे.
यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व भाजी व्यवसायीकांच्या वतीने आमदार साहेबांचा याठिकाणी सन्मान करण्यात आला. या भाजीमंडई संबंधी जी काही नियमावली असेल त्या नियमावलीचे काटेकोरपणे आपण सर्वांनी पालन करावे, असेही आवाहन यावेळी आमदारांनी केले. पुढील कालावधीमध्ये या व्यवसायिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांसाठी सदैव तत्पर राहू असे आश्‍वासन त्यांनी दिले. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा गाळेधारकांना व्यवसायिक गाळे हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला.