28 एकर गायरान जागा हस्तांतरीत होणार
निगडी : पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शैक्षणिक विस्तार पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे. त्याकरिता चिखलीची 28 एकर गायरान जागा महसुल विभागाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. लवकरच अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचे काम सुरु होणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे गट नं 539 मधील एकूण 85 एकर गायरान जागेचा ताबा देण्यात आला होता. या भूखंडाच्या देखभालीचे काम मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपविण्यात आले होते. यापैकी 30 एकर जागा एमएनजीएल पंप, मंदीर, तलाठी कार्यालय, शाळा अशा विविध सार्वजनिक हितासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यापैकी 28 एकर जागा शासकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्ताराकरिता हा भूखंड उपलब्ध करुन देण्याची मागणी च्च व तंत्रशिक्षण विभागाने महसुल विभागाकडे केली होती. ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित होती.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार
दरम्यान, ही गायरान जागा चिखली गावच्या मालकीची असल्याने या भूखंडापैकी 15 एकर जागा सार्वजनिक सोयी-सुविधांकरिता उपलब्ध करुन देण्याची ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. याकरिता विभागीाय आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड नवनगर किास प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. आता चिखली गावच्या गट नं.569 मधील 11 हेक्टर 30 गुंठे जागा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्तारीकरणाला 30 वर्षांच्या भाडपट्टयाने नाममात्र एक रुपया दराने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.