चिखली-तरसोद महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा शुभारंभ

0
अक्षय तृतीयेचा मुहूर्त ; वाहनधारकांना मोठा दिलासा
मुक्ताईनगर:- चिखली ते तरसोद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी चिखली येथे करण्यात आला. माजी महसूल मंत्री  एकनाथराव खडसे व  खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले. गुरुवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा बँक अध्यक्षा तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष आमीर साहब, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक  कांडेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, चोपडा पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, चोपड्याचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परीषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील, उपसभापती प्रल्हाद जंगले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, भाजपा जिल्हा चिटणीस राजू माळी, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शकील सर,, स्विय सहाय्यक योगेश कोलते, जि.प.सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, वैशाली तायडे, वनिता गवळे, सर्व पंचायत समिती सदस्य, भाजपा तालुका सरचिटणीस सतीश चौधरी, संदीप देशमुख, डॉ.बी.सी.महाजन आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.