‘चिट इंडिया’चे दुसरे पोस्टर रिलीझ

0

मुंबई : बॉलिवूडचा सिरीयल किसर इमरान हाश्मी गेल्या कित्येक दिवसांपासून चित्रपटापासून दूर होता. आता एका सामाजिक विषयाला घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘चिट इंडिया’. शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे दुसरे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

पोस्टरसोबतच चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली गेली आहे. १२ डिसेंबरला हा ट्रेलर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘चिट इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमिक सेन करत आहेत. तसेच इमरान हाश्मीच्याच प्रोडक्शन हाऊसमार्फत निर्मिती होणार आहे.