चितोडा गावातील तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेत संपवली आपली जिवनयात्रा पोलीसांनी केली घटनेची नोंद

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील चितोडा गावातील अविवाहीत तरुणाची संतापाच्या भरात शेतातील विहिरीत उडी घेवुन एका शेतमजुर तरूणाची आत्महत्या,पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की दुर्गस संतोष किनगे वय२३वर्ष राहणार चितोडा तालुका यावल या तरूणाने दिनांक २८ सप्टेंबर गुरूवार रोजी वाजेच्या सुमारास यावल शिवारातील देविदास तुकाराम काम पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . सदरच्या या अविवाहित तरूणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही , या घटनेची खबर यावल पोलीस ठाण्यात गावाचे पोलीस पाटील पंकज वारके यांनी दिल्याने अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहे . मयत तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे आणी वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर चौधरी यांनी केले .