चितोडा येथील तरुणाचे खून प्रकरण : अटकेतील चौथ्या आरोपी कोठडीत

Murder of a youth in Chitoda over a loan of Rs 4 Lakh : Accused of Atraval Remanded to Five Days Police Custody
यावल :
तालुक्यातील चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे (३८) या तरुणाचा उसनवारीने दिलेल्या पैशांच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी सुरूवातीला महिलेसह तिघांना अटक करण्यात आली होती तर या खुनात जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक (रा.अट्रावल) याचा सहभाग असल्याने त्यासदेखील बुधवारी अटक करण्यात आली. संशयीताला गुरूवारी येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अन्य तीन आरोपींना २९ पर्यंत पोलिस कोठडी
यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यात कल्पना शशिकांत पाटील (रा.चितोडा), देवानंद बाळू कोळी (मूळ रायावल, हल्ली मु.चितोडा) व मितेश उर्फ विघ्नेश भरतसिंग बारेला (रा.निमगाव) या तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २९
ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील, भूषण चव्हाण करीत आहे.