चितोडा शिवारात अज्ञातांनी उभा हरभरा पेटवला

यावल : शेतकर्‍याच्या शेतातील शेतातील हरभर्‍याला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने 47 हजारांचे नुकसान झाले. चितोडा शिवारात घडलेल्या घटनेप्रकरणी यावल पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताचा पोलिसांकडून शोध
दिनेश रमेश कुरकुरे (40, रा.चितोडा) यांनी चितोडा विठ्ठल मंदिराच्या ट्रस्टच्या मालकीचे शेत बटाईच्या माध्यमातून केले आहे. यंदा त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हरभराची लागवड केली व दोन दिवसांत नंतर हरभरा काढण्याच्या तयारीत असताना अज्ञात व्यक्तीने रविवार, 13 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अंदाजे 10 क्विंटल असलेला हरभरा पेटवून दिला. याबाबत शेतकरी दिनेश कुरकुरे यांनी यावल पोलिस ठाण्यात धाव घेऊन 47 हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक किशोर परदेशी करीत आहेत.