सावदा । येथील चितोडे वाणी समाजातर्फे ढोकळे राम मंदिरात दहिहंडी उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यास समाजबांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रमात समाजातील चिमुकल्यांनी आपले गुणकौशल्य सादर केले. यानंतर सकाळी महाप्रसाद वाटप झाले.
सायंकाळी राम मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत पालखी सोहळा त्याच ठिकाणी दहिहंडी फोडण्यात आली. पालखी परत मंदिरात आल्यावर आरती करण्यात आली. यानंतर पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात यशस्वी झालेल्या मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले. या पालखीला शेकडो वर्षांची परंपरा असून येथून आषाढी एकादशीला देखील गाव प्रदक्षिणा घालून पालखी निघते. या पालखी मिरवणूकीत समाजातील महिला भगिणींनी भक्तीगिते सादर केली. सावदा शहरात चितोडे वाणी समाजातर्फे काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.